Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा सरकारच्या ताब्यात

Webdunia
शनिवार, 23 मे 2020 (07:30 IST)
कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना खासगी रुग्णालयाध्ये अवाच्यासव्वा बिल आकारून रुग्णाची लूट होण्याचे प्रकार समोर आले आहेत. याचमुळे आता राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला असून, ३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा ताबा असणार आहे. याशिवाय राज्य सरकारने उपचार खर्चाची मर्यादाही ठरवून दिली आहे.
 
दरम्यान शासन निर्णयानुसार खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटांचा ताबा आणि रुग्णाला किती बिल आकारले जाणार हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असणार असून, उरलेल्या २० टक्के खाटांसाठी दर आकारण्याचा अधिकार रुग्णालयांकडे राहणार आहे.असे असतील दर दरम्यान शासन निर्णयानुसार वॉर्ड, विलगीकरण बेडसाठी चार हजार रुपये आकारले जाणार आहेत. तर व्हेंटिलेटरशिवाय असणाऱ्या आयसीयू बेडसाठी ७५०० आणि व्हेंटिलटर सपोर्ट असणाऱ्या आयसीयू बेडसाठी ९००० रुपये आकारले जाणार आहेत. तसेच राज्य सरकारने इतर २७० प्रक्रिया आणि शस्त्रक्रियांसाठीचे दरही ठरवले आहेत. यामध्ये कॅन्सर उपचाराचाही समावेश आहे. यामध्ये डॉक्टरांच्या फीचाही समावेश असणार आहे. हॉस्पिटलची तयारी असेल तर ते अतिरिक्त रक्कम डॉक्टरांना देऊ शकतात.
 
विशेष बाब म्हणजे धर्मदाय विश्वस्तांकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व रुग्णालयांचा या निर्णयात समावेश असणार आहे. प्रसूतीसाठी रुग्णालये ७५ हजारापेक्षा जास्त बिल आकारु शकत नाही. तर सिझर असेल ८६,२५० पर्यंत बिल आकारु शकते. तसेच गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी १ लाख ६० हजार रुपये तर अँजिओग्राफीसाठी रुग्णालय १२ हजारापेक्षा जास्त बिल आकारु शकत नाही. अँजिओप्लास्टी करण्यासाठी १.२ लाखांपेक्षा जास्त बिल आकारले जाऊ शकत नाही असे या आदेशात म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments